यालोवा प्रांत
Appearance
यालोवा प्रांत Yalova ili | |
तुर्कस्तानचा प्रांत | |
यालोवा प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान | |
देश | तुर्कस्तान |
राजधानी | यालोवा |
क्षेत्रफळ | ८४७ चौ. किमी (३२७ चौ. मैल) |
लोकसंख्या | २,११,७९९ |
घनता | २४० /चौ. किमी (६२० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | TR-77 |
संकेतस्थळ | yalova.gov.tr |
यालोवा (तुर्की: Yalova ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्माराच्या समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे २.२ लाख आहे. यालोवा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. १९९५पासून स्वतंत्र असलेला हा प्रांत त्याआधी १९३० पासून इस्तंबूल प्रांताचा तर त्याही आधी कोचाएली प्रांताचा भाग होता.
या प्रांतात सहा प्रभाग आहेत.
- आल्तिनोव्हा प्रभाग
- अर्मुटुलु प्रभाग
- सिफ्टलिक्कोय प्रभाग
- सिनार्चिक प्रभाग
- टेर्माल प्रभाग
- यालोवा प्रभाग (शहर)
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत