iBet uBet web content aggregator. Adding the entire web to your favor.
iBet uBet web content aggregator. Adding the entire web to your favor.



Link to original content: https://mr.wikipedia.org/wiki/इंचॉन_आंतरराष्ट्रीय_विमानतळ
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया Jump to content

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ
인천국제공항
आहसंवि: ICNआप्रविको: RKSI
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
प्रचालक इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ कॉर्पोरेशन
कोण्या शहरास सेवा सोल महानगर क्षेत्र
स्थळ इंचॉन, ग्यॉंगी प्रांत
समुद्रसपाटीपासून उंची २३ फू / ७ मी
गुणक (भौगोलिक) 37°27′48″N 126°26′24″E / 37.46333°N 126.44000°E / 37.46333; 126.44000
सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी ३,८९,७०,८६४

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ICNआप्रविको: RKSI) हा दक्षिण कोरिया देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी सोलच्या ४८ किमी पश्चिमेस इंचॉन शहरामध्ये एका छोट्या कृत्रिम बेटावर बांधला गेला असून तो मार्च २००१ पासून कार्यरत आहे. इंचॉन विमानतळ जगातील सर्वात अत्यानुधिक विमानतळांपैकी एक असून त्याला २००५ ते २०१२ दरम्यान सलग ७ वर्षे जगातील सर्वोत्तम विमानतळ असा पुरस्कार मिळाला आहे.

कोरियन एर, एशियाना एरलाइन्स इत्यादी प्रवासी व मालवाहतूक करण्याऱ्या विमान कंपन्यांचा इंचॉन विमानतळ हा एक हब आहे. सध्याच्या घडीला येथून सुमारे ९० विमान कंपन्या १००हून अधिक शहरांना विमानसेवा पुरवतात.

हा विमानतळ सुरू होण्याआधी गिम्पो आंतरराष्ट्रीय विमानतळ सोलचा मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ होता.

भारतामधील खालील शहरे इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत जोडली आहेत.

कंपनी शहर
एर इंडिया दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
एशियाना एरलाइन्स दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
कोरियन एर मुंबई - छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]