iBet uBet web content aggregator. Adding the entire web to your favor.
iBet uBet web content aggregator. Adding the entire web to your favor.



Link to original content: https://mr.wikipedia.org/wiki/अपोलो_११
अपोलो ११ - विकिपीडिया Jump to content

अपोलो ११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अपोलो ११चा बिल्ला

अपोलो ११ हे अमेरिकेचे अंतराळयान होते. या यानातून नील आर्मस्ट्रॉंगएडविन आल्ड्रिन यांनी २० जुलै, १९६९ रोजी चंद्रावर प्रथम प्रवास केला. त्यासाठी एका लहान उपयानाचा वापर झाला. या यानाला लुनार मोड्यूल असे म्हणत असत. पृथ्वीवरून चंद्रापर्यंत नेणारे मुख्य यान चंद्राभोवती फिरत राहिले होते. या यानाला कमांड मोड्यूल असे म्हणत. चंद्रावर उतरणाऱ्या यानाला अलगदपणे खाली उतरणे आणि पुन्हा उड्डाण करून मुख्य यानापर्यंत जाऊन मिळणे यासाठी लागणारे इंधन व दळवळणाची व्यवस्था त्यात केलेली होती. चंद्रावर पोहोचताच ‘ह्य़ूस्टन, ट्रॅंक्विलिटी बेस हिअर, ईगल हॅज लॅन्डेड’ हा चंद्रावरून आलेला संदेश जगभर दूरचित्रवाणी आणि रेडिओवरून दिला गेला.

अपोलो ११ या मोहिमेबद्दलची मराठी पुस्तके

[संपादन]
  • अपोलो ११ : माणसासाठी एक पाऊल, मानवजातीसाठी एक उत्तुंग झेप...(सुधीर फाकटकर)

हे सुद्धा पहा

[संपादन]